CM Devendra Fadnavis – राज्यात गेल्या २४ तासात राज्यातील विविध भागात तुफान पाऊस बरसत आहे. या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेय. पण सरकारी यंत्रणा सज्ज असून, परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. भरतीच्या परिस्थिवर लक्ष सरकार ठेवून आहे. बहुतेक नद्यांना इशारा दिलेला आहे. अतिवृष्टीमुळं शेती आणि जनावाराचं मोठं नुकसान झाले आहे.काही ठिकाणी पाणी भरलंय आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्ठी झालेली आहे. पण सरकारी यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मिठी नदीत घोटाळा कोणी केला?
दरम्यान, मुंबईत लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मिठी नदीवरील काही लोकांना स्थालंतरित करण्यात आलेय. जो पावसाबाबत इशारा दिलाय, तिकडे आमचे लक्ष आहे. सुट्टी दिली ज्यामुळं लोकांना येण्याजाण्याच त्रास होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडलेला आहे. काही भागात ३०० मी.मी पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी वॉटर लॉगिग झालेलं आहे. पण मिठी नदीची परिस्थिती कोणामुळं झाले. कोणी घोटाळा केला, हे सर्वांना माहित आहे, अशी टिका मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता केली.
तत्काळ पंचनामे करुन मदत करणार…
एनडीआरफ एसडीआरफला अल्रटवर ठेवण्यात आले आहे. आपल्या बाजुच्या राज्यासोबत संपर्क आहे. पाण्याच्या विसर्गसाठी जी यंत्रणा लागते, त्याबाबत काम सुरु आहे. तेलंगणा राज्यासोबत आपला संपर्क सुरु आहे. राज्यात १२ ते १४ लाख हेक्टवर पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी मृत्यांच्या घटना घडल्या आहेत तिथे जिल्हाधिकारी यांना मदतीचे अधिकार दिले आहे. पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. असे निर्देश दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं अतिवृष्टी झाली आहे. ज्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे, तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनान करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





