State Cabinet Meeting – आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण चार धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. तर यात महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील तीन निर्णय घेण्यात आले, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील एक निर्णय घेण्यात आला आहे. पाहूया आजच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय…

बैठकीत महत्वाचे निर्णय कोणते…?

– मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

– कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

– सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

– राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

राज्यात 42,892 कोटींची गुंतवणूक…

दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनेक कंपन्यांनी आणि गुंतवणूकदारांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करार आणि 2 रणनीतिक करार केले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक आज करण्यात आली असून, यामुळं 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती होणार आहे. तसेत हायपरलूप प्रकल्पाला गती मिळणार आहे. दरम्यान, या करारानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रिकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

28 हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती…

या करारातून 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळ बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करताहेत. दरम्यान, यूकेसोबत रणनीतिक करार झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. आज विविध क्षेत्रातील गुंतवणुकींसाठी महत्त्वाचे ८ सामंजस्य करार (MoUs) आणि २ रणनीतिक करार करण्यात आले.