मुंबईत आंतरराष्ट्रीय डबेवाला अनुभव केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार, काय पाहयला मिळणार केंद्रात?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
लोकांना आमची विनंती आहे की, त्याचा आपण निश्चित लाभ घ्या, आणि येथे येऊन पहा आणि त्याचा आनंद निश्चित घ्या, असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आवाहन केलं आहे. यात डबेवाल्यांचा इतिहास व प्रवास पाहयला मिळणार आहे.
मुंबईत आंतरराष्ट्रीय डबेवाला अनुभव केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार, काय पाहयला मिळणार केंद्रात?

International Dabbawala Experience Center : उत्तम नियोजनसाठी मुंबईच्या डबेवाल्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. कोणतीही चूक न करता मुंबईसारख्या प्रंचड गर्दीच्या शहरात डबा वेळेवर पोहचवणे ही मुंबईच्या डबेवाल्यांची ख्याती आहे. मॅनेजमेन्टसाठी गुरु किंबहुना उत्तम मॅनेजमेन्टसाठी जगभरात मुंबईचे डबेवाले प्रसिद्ध आहेत. दरम्यान, याच डबेवाल्यांचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास, इतिहास मुंबईत जिंवत होणार आहे. मुंबईतील ब्रांदा येथे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र लवकरच सुरु होणार आहे.

सर्वांनी लाभ घ्या…

दरम्यान, आता डबेवाला भवनमध्ये तिसरं ठिकाण म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांचा इतिहास आणि प्रवास असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनुभव केंद्राचे उद्घाटन होणार आहे. तर डबेवाला भवनसाठी जागाही मुंबई पालिकेनं दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की, त्यांनी या केंद्राला डेव्हलप करण्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर केला. आणि हे सर्व घडवून आणण्यामागे आमदार श्रीकांत भारतीय यांचा मोठा हात होता. खऱ्या अर्थाने आता डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र होईल.

अनुभव केंद्राची वैशिष्टे काय आहेत?

– डबेवाल्यांची माहिती घेण्यासाठी लेक्चर रूम
– माहितीसाठी थ्रीडी इफेक्ट असलेले गाॅगल्स उपलब्ध
– डबेवाला काळानरूप कसा बदलत गेला, याची मांडणी
– डबेवाल्याबाबत चलचित्र, माहितीपट
– डबासाठी वापरण्यात येणारी सायकल, हातगाडी व डबे
– मुंबई डबेवाल्यांचा इतिहास व प्रवास
– पंढरीची वारी व डबेवाल्यांचे नाते उलगडण्यात आलेय
– महत्वाच्या क्षणचित्रांचे स्वतंत्र दालन
– डबेवाल्यांचे भारतीय पोस्टाने तिकीट प्रकाशित केले, महत्वाचे क्षण यांच्या आठवणी जागृत करणारी छायाचित्र