Marathi News

“ये डर अच्छा है!”, डॉ. माशेलकर अहवालावरून ठाकरे गटाचा भाजपावर घणाघात

Written by:Astha Sutar
Last Updated:
भाजपाला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिले नाही. भाजपाला उद्धव ठाकरे यांची भीती वाटते हेच खरं आहे". "ये डर अच्छा है!" असं पोस्टमध्ये प्रधान यांनी म्हटले आहे.
“ये डर अच्छा है!”, डॉ. माशेलकर अहवालावरून ठाकरे गटाचा भाजपावर घणाघात

Shivsena – गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा व तिसऱ्या भाषेवरून मोठा वाद सुरु आहे. तर हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा तिसऱ्या भाषेचा पर्याय याचा अहवाल स्वीकारल्याच्या आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. या आरोपाला आज ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देत भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाला उद्धव ठाकरे यांची भीती वाटते…

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे. 2020 अंमलबजावणीसाठी ऑक्टोबर 2020 मध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्यीय टास्क फोर्स स्थापन केली आणि त्यांचा अहवाल स्वीकारला. पण याचा अर्थ सर्व सुचनांवर अंमलबजावणी केली जाईल असे नाही. भाजपाला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिले नाही. भाजपाला उद्धव ठाकरे यांची भीती वाटते हेच खरं आहे. “ये डर अच्छा है!”, असं प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी आज एक सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे.

हर्षल प्रधान यांच्या पोस्टमध्ये काय?

“उद्धवसाहेब ठाकरेंनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंमलबजावणीसाठी ऑक्टोबर 2020 मध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्यीय टास्क फोर्स स्थापन केली आणि त्यांचा अहवाल स्वीकारला पण याचा अर्थ सर्व सुचनांवर अंमलबजावणी केली जाईल असे नाही. यातल्या ज्या योग्य सुचना असतील त्यावर नक्की अंमलबजावणी केली जाईल. तशी सुरुवातही उद्धवसाहेबांनी केली होती. मात्र भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले.

आज केवळ राजकारणासाठी भाजपा त्या अहवालाचा आधार घेत आहे पण त्या अहवालातील इतर सुचनांचा भाजपाला विसर पडला आहे. भाजपा केवळ हिंदी सक्ती चा आग्रह धरून मराठी माणसांना डिवचत आहे. त्यांचा हा डाव राज्यातील जनता ओळखून आहे. भाजपाला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिले नाही. भाजपाला उद्धव ठाकरे यांची भीती वाटते हेच खरं आहे”. “ये डर अच्छा है!” असं पोस्टमध्ये प्रधान यांनी म्हटले आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews