आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चाचा केलेला हा स्टंट, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
तुम्हीच निर्णय घेतला होता. त्याच अहवालाची होळी केली. आणि आता त्याच निर्णयाची विजयी रॅली, हे म्हणजे प्रसिद्धी आणि स्टंटसाठी केलेला हा प्रयत्न असल्याची टिका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरेंवर केली आहे.
आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चाचा केलेला हा स्टंट, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत दोन्ही जीआर रद्द केले आहेत. दरम्यान, त्रिभाषेचा दोन जीआर सरकारने रद्द केल्यानंतर आता यावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येताहेत. सरकारच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर टिका केली आहे.

…मग विजयी रॅली कसली काढता?

दरम्यान, आम्ही राज्यातील सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठीची सक्ती केली, पण हिंदीची सक्ती केली नाही. आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या भवितव्याशी खेळणार नाही. २०२० सालच्या माशेलकर अहवाल तुम्हीच स्विकाला होता. मग ही कसली विजयी रॅली काढता. तुम्हीच निर्णय घेतला होता. त्याच अहवालाची होळी केली. आणि आता त्याच निर्णयाची विजयी रॅली, हे म्हणजे प्रसिद्धी आणि स्टंटसाठी केलेला हा प्रयत्न असल्याची टिका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरेंवर केली आहे.

तोंडी विधानावर विश्वास ठेवणार नाही…

दुसरीकडे या जीआर रद्दच्या घोषणेनंतर सर्वंत्र आनंद साजरा केला जात आहे. फटाके आणि ऐकमेकांस पेढे वाटले जाताहेत. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आता यावर शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक आणि पालकांच्याही प्रतिक्रिया येताहेत. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणाच्याही तोंडी विधानावर विश्वास ठेवणार नाही. पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी सक्ती नसल्याचे सांगून नंतर तिसरी भाषा सक्ती केलीच. त्यामुळे तिसरी भाषा रद्द केल्याचा आधी जीआर काढा. नंतर आम्ही यावर विश्वास ठेवू, असं शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक आणि पालकांनी म्हटलं आहे.