State Rain – गेल्या 24 तासापासून मुंबई आणि उपनगरासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे, तसा मुंबई आणि उपनगरात रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांच्यावर दिसून येत आहे. पावसामुळं मुंबई लोकल ट्रेन पूर्णपणे ठप्प झाला आहे. अजूनही लोकल सेवा बंद आहे. दरम्यान, गेल्या 24 तासापासून मुसळधार पडत असल्यामुळं बदलापूर, उल्हासनगर येथील उल्हास नदी तुडुंब भरली आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास नदीतील पाणी बाहेर येण्याची शक्यता आहे.
पावसामुळं बदलापूर-अंबरनाथ जलमय…
दुसरीकडे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना लोकांना त्रास होत आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर गेल्या 24 तासात पडत असल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळं कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
पावसामुळं नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला…
दरम्यान, आज मुंबई आणि ठाण्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली असून, मुंबईत शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, उल्हास नदी ही बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ आदी शहरातून जाते. परंतु मुसळधार पावसामुळं नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे जर पावसाची रिपरिप कमी झाली नाहीतर उल्हास नदीतील पाण्याची वाढून, पाणी नदीच्या बाहेर येईल, असं सांगण्यात येतंय.





