उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची तर विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे. मात्र हे दोनच उमेदवार ही निवडणूक लढवणार नाही, तर यामध्ये एका तरुणाने अर्ज दाखल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
उमेश म्हेत्रेचा अर्ज चर्चेचा विषय
विशेष म्हणजे हजारो पुण्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर या गावातील आहे. उमेश म्हेत्रे असे या तरुणाचे नाव आहे. दिल्लीतील राज्यसभेच्या उदाहरणात निवडणूक निर्णय अधिकारी पीसी मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे त्याने आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. उमेदवारीसाठी लागणार 15000 रुपयांचे डिपॉझिट आहे. त्याने जमा केलं आहे. या तरुणाच्या या धाडसी पावलामुळे राजकीय आणि स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलं आहे.
उमेशकडून सर्व अटींची पूर्तता
तरुणाने दाखल केलेला अर्ज हा सर्वसामान्यांमधील तसेच तरुणांमधील आत्मविश्वास आणि जिद्दीचा दर्शन घडवणार ठरला आहे. कारण भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराला वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वीस प्रस्तावक तसेच वीस अनुमोदकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. उमेशने या सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा केला.
उमेश म्हेत्रे नेमका कोण?
पुण्याच्या दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने थेट उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या त्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. उमेशने विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला होता, मात्र दहा आमदारांच्या सह्या न मिळाल्याने त्याने माघार घेतली होती. एकीकडे देशातील दोन दिग्गज आघाड्या आणि दुसरीकडे हा सर्वसामान्य तरुण यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या या तरुणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता निवडणूक आयोगाकडून त्याच्या अर्जाची छाननी होईल आणि हा अर्ज वैध ठरल्यास तो निवडणुकीत काय प्रभाव पडतो? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. तो माघार घेईल अशी शक्यता अधिक आहे.






