महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधीबाबत अपडेट; शेतकऱ्यांच्या खात्यात 7 व्या हप्त्याचे 2,000 जमा होणार!

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या ७ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ हजार रूपये जमा केले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधीबाबत अपडेट; शेतकऱ्यांच्या खात्यात 7 व्या हप्त्याचे 2,000 जमा होणार!
महाराष्ट्र शासनाची शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राबविण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. उद्देश म्हणजे शेतीवरील खर्च कमी करणे, शेतकरी आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. खरंतर आता या योजनेच्या 7 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारनं सातव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी करण्यासाठी 1932.72 कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7 व्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे 1932.72 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

7 व्या हप्त्याचे 2,000 खात्यामध्ये जमा होणार!

महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेप्रमाणं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षात 6000 रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं रक्कम दिली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम दिली जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारनं पीएम किसानच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24 पासून सुरु केली आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते या योजनेची शिर्डी येथील कार्यक्रमातून सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा सहावा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकऱ्यांना 2169 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं होतं.

पीएम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्रात योजना

खरंतर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांची देखील योजनेला विशेष पसंती मिळाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.  आता या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार याबाबत आता अजून अधिकची स्पष्टता येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.