Marathi News

कापडी पिशवी वापर करा, प्लास्टिकचे वापर टाळा, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंचे आवाहन

Written by:Astha Sutar
Published:
प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामाविषयी प्रबोधन केले. तसेच प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगितले. प्लास्टिक बंदी सक्तीचे करण्यात आल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
कापडी पिशवी वापर करा, प्लास्टिकचे वापर टाळा, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंचे आवाहन

Pankaja Munde – प्लास्टिक मुळे कॅन्सर सारखा आजार देखील जडला जातो. याकरिता तीर्थक्षेत्र परिसरामध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा. दुकानदारांनी देखील माफक दरामध्ये कापडी पिशवी शिवून त्याचा वापर करावा. असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजाताई यांनी केले. श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे मंत्री पंकजाताई मुंडेंनी भेट देऊन प्लास्टिक बंदीबाबत सर्व भक्तांना आवाहन केले.

कापडी पिशवीचा वापर करावा…

दरम्यान, पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार अक्कलकोट शहरामध्ये प्लास्टिक बंदीची कारवाई मोठ्या प्रमाणात सक्तीची केली जाईल. याकरिता नागरिक व व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशवीचे वापर करणे टाळून कापडी पिशवीचा वापर करावा, असे अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निखिल मोरे, मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र…

दुसरीकडे प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र या अभियानानुसार प्रथम राज्यातील सर्व तीर्थक्षेत्र प्लास्टिक मुक्त करण्याच्या नियोजन असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. सर्व स्वामी भक्तांशी संपर्क साधून प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामाविषयी प्रबोधन केले. तसेच प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगितले. प्लास्टिक बंदी सक्तीचे करण्यात आल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, मंदिर समितीचे कारभार व स्वच्छता पाहून पंकजाताई यांनी समाधान व्यक्त केले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews