MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

राज्यातील 23 नगरपालिकांसाठी मतदान सुरू; उद्या 21 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सध्या सुरू आहेत. आज 23 नगरपालिकांसाठी मतदान होत आहे. यामध्ये उद्या म्हणजेच 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्यातील 23 नगरपालिकांसाठी मतदान सुरू; उद्या 21 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजता ही मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांचा देखील चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

कुठे अन् कशासाठी मतदान प्रक्रिया सुरू ?

यवतमाळ, वाशीम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी- उरुळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अनंजनगाव सूर्जी, बाळापूर, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर याशिवाय विविध जिल्ह्यातल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठीही आज मतदान होणार आहे.

नेत्यांनी कंबर कसली; प्रतिष्ठा पणाला

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात घोळ बघायला मिळाला. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होता.

21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार

मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर 21 डिसेंबरपर्यंत निकाल राखीव ठेवण्यात आली. आता आता 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडेल. अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे उद्याच्या निकालात नेमके काय चित्र दिसते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.