Sanjay Nirupam – जे लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपासून दूर गेले आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडचे वारसदार होण्याचा अधिकारच नाही. “उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत आघाडी करून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांची हिंदी आणि हिंदुत्वविरोधी भूमिका ही देखील बाळासाहेबांच्या मूळ विचारसरणीच्या विरोधात आहे.” अशी टिका शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम यांनी ठाकरे बंधूंवर केली.
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा अपप्रचार…
दरवेळी जेव्हा BMC निवडणुका जवळ येतात, तेव्हा काही लोकं ‘मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा’ अपप्रचार सुरू करतात आणि जनतेच्या भावना भडकावतात. अलीकडे ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत आणि मीरा रोडच्या सभेतही असाच मजकूर आढळतो. मात्र मुंबई ही महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहील. याबाबत कुणीही गफलत करू नये, शिवसेना त्याला जोरदार उत्तर देईल, असं संजय निरुपम यांनी आरोप केला म्हणाले.
ठाकरे ब्रँडपेक्षा शिंदे ब्रँड अधिक प्रभावी…
आज ठाकरे ब्रँडपेक्षा शिंदे ब्रँड हा अधिक मजबूत आणि लोकप्रिय ठरत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाच्या सन्मानासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत, असं निरुपम म्हणाले. तसेच त्यांनी पुढे राज ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटलं की, आपला मुलगाही निवडणुकीत जिंकवू न शकणाऱ्या राज ठाकरे यांना वारसत्त्वाची भाषा शोभत नाही. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्या मंत्र्यांची खिल्ली उडवणं, हे ठाकरे ब्रँडचं प्रतिनिधित्व करत नाही. असा प्रहार निरुपमांनी ठाकरे बंधूवर केला.





