कोल्हापूर: शहरवासियांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. दोन दिवसांत संपूर्ण शहरासह सलग्न उपनगर आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच, बुधवार 11 जून रोजी पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. मात्र, बालिंगा योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या सी आणि डी वॉर्डमधील भागांवर याचा परिणाम होणार नाही. कोल्हापूर शहर आणि परिसरातील उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी पंपिंग स्टेशनमध्ये मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
पुईखडी, कलिकते नगर, सुलोचना पार्क, नाना पाटील नगर, जिवबा नाना, बापूरामनगर, तपोवन, देवकर पाणंद, संभाजीनगर स्टँड, रामानंद नगर, बालाजी पार्क, सुभाषनगर, भारती विद्यापीठ परिसर, शिवाजी पेठ, बेलबाग, महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, राजकपूर पुतळा परिसर, वाय.पी. पोवार नगर, जवाहर नगर, इ. संपूर्ण राजारामपुरी, शाहूमिल परिसर, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, राजेंद्रनगर, सम्राट नगर, नवश्या मारुती चौक, कामगार चाळ, महावीरनगर, जागृतीनगर, अंबाई डिफेन्स, कसबा बावडा, लाईन बाजार, रुईकर कॉलनी, सदर बाजार, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड, सी.बी.एस., शाहुपुरी, टेंबलाई वाडी, पाच बंगला परिसर इत्यादी.
पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन
पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या काळात त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ पाण्याचा साठा करून ठेवावा, असेही सुचवले आहे. बुधवारपासून पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. उद्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती आहे.






