Marathi News

KDMC WaterCut: कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या एरियाला बसणार फटका?

Written by:Rohit Shinde
Published:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी तब्बल 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. नेमका पाणीपुरवठा का बंद राहणार? कोणत्या एरियातील पुरवठा प्रभावित होणार, ते जाणून घेऊ...
KDMC WaterCut: कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या एरियाला बसणार फटका?

कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. महानगर पालिका क्षेत्रामध्ये केव्हा पाणी पुरवठा बंद असणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पाणी नसणार आहे, किती वेळासाठी पाणी पुरवठा बंद असेल? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…

12 तास पाणीपुरवठा राहणार बंद

कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. अनेक दिवसांच्या मोठ्या काळानंतर महानगर पालिकेने आपल्या क्षेत्रामध्ये जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम काढले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणाची दुरूस्तीची कामे करण्यासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. “अ” प्रभागक्षेत्रातील मांडा- टिटवाळा परिसरामध्ये मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून करण्यात येणाऱ्या पाणी वितरणाच्या व्यवस्थेतील जलवाहिन्यांची दुरूस्तीची कामे करण्याकरिता येत्या मंगळवारी दि.11- 11- 2025 रोजी सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे.

कुठे पाणीपुरवठा प्रभावित होणार?

महानगर पालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील काही भाग, तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गाव या परिसरातील होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सोमवारी म्हणजेच 10- 11- 2025 रोजीच सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती. महानगर पालिका प्रशासनाने केली आहे. येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हँडलवरून देण्यात आली आहे. नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews