Mansoon Session : ३० जून रोजी सुरु झालेले पावसाळी अधिवेशनाचे सूप काल वाजले. एक दोन नाहीतर तब्बत तीन आठवडे हे पावसाळी अधिवेशन चालले. मात्र १८ दिवस चाललेल्या या अधिवेशनातून महिला, रोजगार, नोकरदारवर्ग, आरोग्य, शेती, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी वर्गाला काय मिळाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिवेशनाचे फलित काय असा प्रश्न विचारला जात आहे.
जनतेला काही मिळाले नाही…
तब्बल १८ दिवस पावसाळी अधिवेशन चालले. या अधिवेशनाच अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विक्रमी लक्षवेधी मांडण्यात आल्या तर १६ विधेयकं पारीत करण्यात आली. पण जनता याकडे या अधिवेशनातून आपणाला काहीतरी मिळेल, याकडे आस लावून बसली होती पण सामान्य जनतेला केवळ भोपळा मिळाला आहे. भोपळा… अशी टीका पावसाळी अधिवेशनावरून आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे
हे ही वाचा
तर आम्ही सातत्याने तीन आठवडे सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. रोज विक्रमी लक्षवेधी मांडल्या गेल्या. जिथे लक्षवेधीला अर्धा तास वेळ असतो. तिथे १० मिनिटात लक्षवेधी उरकल्या गेल्या. एवढ्या घाई गडबडीने विधानसभा अध्यक्षांनी काम आटोपते घेतले.
जनतेच्या हिताचे निर्णय…
राज्यात वीजेची वाढती मागणी लक्षात घेता सौर ऊर्जा प्रकल्पावर भर देण्यात आला आहे. धारावीतील पात्र रहिवाशांना तेथेच घर, मुंबईकरांना परवडणारी एसी लोकल आदी विषयावर निर्णय घेण्यात आले. सभागृहात चर्चा झाली. कृषी, आरोग्य, शिक्षण, आदी क्षेत्रासाठी या अधिवेशनातून खूप काही मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विशेष म्हणजे क्राईम रेकॉर्डमध्ये घट, पोलीस भरतीला वेग देणार आहे.
त्यामुळं या अधिवेशनातून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. अशी प्रतिक्रिया “ईटीव्ही भारत”शी बोलताना प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.