“102 नंबर रुमचे काय झाले? पैसे कोणाचे होते?”, धुळे रोकड प्रकरणावरुन खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकेल, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. मात्र आत्तापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं. असा सवाल राऊतांंनी उपस्थित केला.
“102 नंबर रुमचे काय झाले? पैसे कोणाचे होते?”, धुळे रोकड प्रकरणावरुन खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल

Sanjay Raut : धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथील खोली क्रमांक 102 बद्दल विचारलं. कारण 102 नंबरची खोली सध्या भारतभर गाजत आहे. धुळे रोकड प्रकरणीतल “102 नंबर रुमचे काय झाले? हे पैसे कोणाचे होते?” असा सवाल खासदार संजय राऊतांनी यांनी उपस्थित करत, धुळ्यातील पैसे कोणाचे होते, याबाबत मला दिल्लीतून विचारलं जातेय. 102 नंबरच्या खोलीवर सिनेमा देखील काढावा लागेल, असा निशाण राऊतांनी सरकारवर साधला.

फडणवीसांनी किती जणांना तुंरुगात टाकलं

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा खासदार संजय राऊत हे धुळे दौऱ्यावर आहेत. खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही आमचं मनोबल खच्चीकरण करू शकत नाही,” असा आरोप करुन संजय राऊत यांनी पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या एका पदाधिकाऱ्यावरती खोटे गुन्हे दाखल करताना हे पोलीस अधीक्षक तत्परता दाखवतात हा सरळ सरळ या राज्यातला दहशतवाद आहे. माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकेल, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. मात्र आत्तापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं. असा सवाल राऊतांंनी उपस्थित केला.

ती तत्परता 102 खोलीबाबत का नाही?

राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृत पीएकडं दीड दोन कोटी रुपयांची कॅश सापडली. या खोलीमध्ये धुळ्यातल्या आसपासचे ठेकेदार दोन दिवसापासून पैसे गोळा करत होते. काही रक्कम बाहेर गेली तर दहा कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते,” असा आरोप त्यांनी केला. अंदाज समितीच्या चेयरमनच्या पीएकडं आढळली रोख : “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी असणारे कामराज निकम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही तत्परता तुम्ही 102 खोलीबाबत का दाखवली नाही. अशी टिका राऊतांनी केली.