गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस कुठे? 24 तासांमध्ये आपत्तीमुळं मृत्यू व जखमी किती?

Written by:Astha Sutar
Published:
पुढील 24 तासासाठी कोकण किनारपट्टीला म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस कुठे? 24 तासांमध्ये आपत्तीमुळं मृत्यू व जखमी किती?

Maharashtra Weather : पावसाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या २४ तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासासाठी काही जिल्ह्यांना रेड, यलो आणि ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला होता. वाशिम, यवतमाळ या ठिकाणी गेल्या २४ तासात सर्वांधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील २४ तासासाठी समुद्रकिनारी उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्रात न जाण्याचा इशारा…

तर दुसरीकडे पुढील २४ तासासाठी कोकण किनारपट्टीला म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच समुद्रात लहान होड्यांनी न जाण्याचा इशारा राज्याच्या आपत्ती विभागाने दिला आहे.

२४ तासांमध्ये आपत्तीमुळं मृत्यू व जखमी किती?

तसेच पुरात वाहून… खड्यात पडून… आणि नदीत वाहून गेलेल्यामुळं आणि झाडं पडून… आणि वीज पडून असे राज्यात गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत.

२४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे

  • वाशिम ८८.५ मि. मी
  • यवतमाळ ७०.३ मि. मी
  • नांदेड ६०.३ मि. मी
  • हिंगोली ४७.१ मि. मी
  • बुलढाणा ३५.४ मि. मी
Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews