मागील २४ तासात महाराष्ट्रात सर्वांधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात? पावसाच्या आपत्तीमुळं मृत्यू व जखमींची आकडेवारी किती?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
राज्यातील पुणे घाट, सातार घाट या ठिकाणी हवामान विभागकडून ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला INCOIS तर्फ २९ जूनपर्यंत, ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
मागील २४ तासात महाराष्ट्रात सर्वांधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात? पावसाच्या आपत्तीमुळं मृत्यू व जखमींची आकडेवारी किती?

Maharashtra Rain – राज्यात आता जून महिन्या संपत आला आहे. दोन तीन दिवसात जुलै महिना सुरु होईल. यावर्षी पावसाने खूप लवकर सलामी दिली. मे महिन्यात अंतिम आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती, ती पावसाची संततधार कायम आहे. सध्या राज्यात सर्वंत्र समाधानकारक पाऊस बरसत आहे. तर मागील २४ तासात पडलेला पावसाचा अहवाल राज्याच्या आपत्ती विभागाने जाहीर केला आहे. या पावसाच्या आपत्तीमुळं मृत्यू व जखमीच्या घटना घडल्या आहेत.

घाट माथ्यावर ऑरेन्ज अलर्ट जारी…

दरम्यान, राज्यातील पुणे घाट, सातार घाट या ठिकाणी हवामान विभागकडून ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला INCOIS तर्फ २९ जूनपर्यंत, ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूरमधील काही डोंगरळभागत जमिनीला भेंगा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मुंबईसह, उपनगरात आणि कोकणात गेल्या २४ तासा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

गेल्या २४ तासात सर्वात पाऊस कुठे?

– सिंधुदुर्ग १९.८ मि. मी
– पालघर १६.१ मि. मी
– रत्नागिरी १५.२ मि. मी
– कोल्हापूर १५.२ मि. मी
– रायगड १९.९ मि. मी

आपत्तीमुळं मृत्यू व जखमींची संख्या किती?

दुसरीकडे गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सततच्या पावसामुळं मृत्यू आणि जखमींच्या घटनाही घडल्या आहेत. विविध कारणामुळं म्हणजे झाड पडून, वादळी वाऱ्याने शेड पडून, झाड पडून, पुरात वाहून, पाण्यात पडून, वीज पडून पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अशी माहिती राज्याच्या आपत्ती विभागाने दिली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews