CM Devendra Fadnavis – महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दिष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून, प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
2 वर्षात देशभरात 4 लाख कृषी पंप बसाविले…
दरम्यान, गेल्या 2 वर्षात देशभरात 4 लाख कृषी पंप बसाविण्यात आले असताना राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देत 5 लाख सौर कृषीपंप बसविले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून 16 हजार मेगा वॉट क्षमतेचे फिडर 2026 पर्यंत सौर ऊर्जेवर परिवर्तीत करण्यात येणार आहेत. हरित इमारतीसाठी असलेली सर्व मानके पूर्ण करणारी, निसर्गाचा पूर्णपणे उपयोग करणारी, ऊर्जेची बचत करणारी आणि आवश्यक असणारी ऊर्जा 100 टक्के निर्माण करणारी, महाऊर्जाची ही नवी इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे. ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात, महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे.
हे ही वाचा
300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचेत…
दुसरीकडे 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी झाली असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. तसेच अपारंपरिक क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी आहे.
2030 पर्यंत 52 टक्के वीज अपारंपरिक स्रोताद्वारे निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.