Thu, Dec 25, 2025

महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या नावाची चर्चा; कोण आहे साताऱ्याचा नवनिर्वाचित नगराध्यक्ष?

Written by:Rohit Shinde
Published:
सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना पराभूत केले.
महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या नावाची चर्चा; कोण आहे साताऱ्याचा नवनिर्वाचित नगराध्यक्ष?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42000 मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना चितपट केले आहे. या निवडणुकीत अमोल मोहिते यांना 57,596 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना 15,556 मते मिळाली आहेत. हा फरक इतका मोठा आहे की, तो विधानसभा निवडणुकीत काही आमदारांनाही मिळत नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे.

अमोल मोहितेंचा दणदणीत विजय

सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना पराभूत केले. या निवडणुकीत अमोल मोहिते यांना ५७,५९६ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार श्रीमती सुवर्णादेवी पाटील यांना १५,५५६ मते मिळाली आहेत. हा फरक इतका मोठा आहे की, तो विधानसभा निवडणुकीतील एखाद्या आमदाराच्या मतांची बराबरी करेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रामशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा अमोल मोहिते, रहिमतपूर येथे वैशाली माने, वाई येथे अनिल सावंत, म्हसवड येथे पूजा विरकर, मलकापूर येथे तेजस सोनवणे, मेढा येथे रूपाली वारागडे यांनी घवघवीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित केली आहे. जिल्ह्यातील या 7 ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या फरकाने विजयी केले असून, सातारा जिल्ह्यात भाजपच्या विजयाचा झंझावात पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपाचे मोठे यश

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रामशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा येथे अमोल मोहिते, रहिमतपूर येथे वैशाली माने, वाई येथे अनिल सावंत, म्हसवड येथे पूजा विरकर, मलकापूर येथे तेजस सोनवणे, मेढा येथे रूपाली वारागडे यांनी घवघवीत विजय मिळवत भाजपची सत्ता प्रस्थापित केली आहे. या सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी मोठ्या फरकाने विजयी केले आहे. या विजयासोबतच सातारा जिल्ह्यात भाजपच्या विजयाचा झंझावात पाहायला मिळत आहे.

याचबरोबर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे संजय हलगरकर, रेणापूर येथे शोभा अकनगिरे, उदगीर येथे स्वाती हुडे, अहमदपूर येथे स्वप्नील व्हते यांनीही दणदणीत विजय मिळवत भाजपच्या यशात भर घातली आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा कौल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगितले.