Mansoon Session – पावसाळी अधिवेशनाच्या आज बुधवारी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नावरुन सरकारच्या विरोधात आंदोलन केले. महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन करत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी या गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
महाराष्ट्राला लुटणाऱ्या धिक्कार असो….
दरम्यान, महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. विविध माध्यमातून चड्डी बनियन गँग लुटण्याचे काम करत आहे. त्यामुळं या सरकारचे करायचे काय.. पन्नास खोके एकदम ओके… चड्डी बनियन गँग हाय हाय… महाराष्ट्राला लुटणाऱ्या धिक्कार असो….दरोडेखोर चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो…, अशा जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केल्या. तसेच सरकरच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन केले. लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय. याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला.
या सरकारचे करायचे काय?
सत्ताधारी आमदार मंत्री गुंडगिरी करतात. त्यामुळं या चड्डी बनियन गँगचे करायचे काय? पायऱ्यांवर बनियन आणि लुंगी घालून विरोधकांचे आंदोलन केले. चड्डी बनियनवर मारामारी करणे… लोकांना लुटणे हे या सरकारमधील नेते करताहेत. लुटारू… चोर… आणि दरोडेखोर यांचा धिक्कार असो… दरोडेखोर चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.





