State Rain – मे महिन्यात सरासरी पेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला. त्यामुळं धरण आणि नदीमध्ये जलसाठा वाढला. उन्हाळ्यात विहिर भरल्या आहेत, नदी नाल्यांना पूर आला. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मे महिन्यातच विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. मात्र गेल्या आ़वड्यापासून पावसाने उसंत घेतली असून, अधूनमधून पाऊस बरसत आहे. तर आज राज्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यातीव अनेक भागात पावसाचा अंदाज…
दरम्यान, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, गेल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र आता पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस राज्यातील विविध भागात म्हणजे कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत पुढील काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरणासह व मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
यलो अलर्ट कुठे?
मुंबईसह कोकणात पुढील काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरणासह व मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचे अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे. सध्याचा पाऊस शेतीसाठी अनुकूल नाही, १० तारखेनंतर पावसाची स्थिती पाहूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलं आहे. तर सध्याच्या पावसामुळं पाण्याचा साठा झाला आहे, पण शेतीसाठी योग्य नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.





