Bank Holidays : सलग 4 दिवस बँका बंद राहणार?? तुमची कामे लवकर उरकून घ्या

Published:
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) कडून २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे
Bank Holidays : सलग 4 दिवस बँका बंद राहणार?? तुमची कामे लवकर उरकून घ्या

Bank Holidays : जर तुम्हाला येत्या काही दिवसांत बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता असून, ग्राहकांना सलग चार दिवस बँक शाखा बंद असल्याचा मनस्ताप सोसावा लागू शकतो.

काय आहे कारण (Bank Holidays)

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) कडून २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा, या मागणीसाठी बँक कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. या संपाचा थेट परिणाम बँकिंग व्यवहारांवर होणार आहे.

२४ जानेवारी रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकांना नियमित सुट्टी आहे. त्यानंतर २५ जानेवारी रविवार, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि २७ जानेवारीला प्रस्तावित संप—या सर्व कारणांमुळे २४ ते २७ जानेवारीदरम्यान देशभरातील बँक शाखा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, ग्राहकांना सलग चार दिवस प्रत्यक्ष शाखांमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. Bank Holidays

या कालावधीत रोख रकमेची देवाणघेवाण, धनादेश मंजुरी, निधी हस्तांतरण, कर्जाचे हप्ते भरणे तसेच इतर तातडीचे व्यवहार अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी आधीच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना

बँक शाखा बंद राहण्याची शक्यता लक्षात घेऊन, सर्व आवश्यक बँकिंग कामे वेळेत पूर्ण करून ठेवावीत.

मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी किंवा रोख व्यवहारांसाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहू नये.

UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ATM सेवा कार्यरत राहतील, मात्र शाखा-आधारित सेवा मर्यादित किंवा पूर्णपणे बंद राहू शकतात.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews