Marathi News

Budget 2026 : सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या दरात वाढ

Published:
नवीन नियमांनुसार, आता सिगारेटवर तिच्या लांबीप्रमाणे २.०५ रुपये ते ८.५० रुपये प्रति स्टिक अशी अतिरिक्त उत्पादन शुल्काची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कालपर्यंत जी सिगारेट १८ रुपयांना मिळत होती, तिची किंमत आता २१ ते २२ रुपयांच्या आसपास पोहोचली आहे
Budget 2026 : सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या दरात  वाढ

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच तंबाखू उत्पादक उद्योग आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने ‘सिन गुड्स’वरील कर संरचना बदलत नवीन कर प्रणाली लागू केली असून, याचा थेट परिणाम सिगारेट, गुटखा, पान मसाला आणि संबंधित उत्पादने यांच्या किरकोळ किमतींवर झाला आहे. ताज्या दरवाढीनंतर काही उत्पादनांच्या किंमतींमध्ये १५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली जात आहे.

किती रुपयांची दरवाढ (Budget 2026)

नवीन नियमांनुसार, आता सिगारेटवर तिच्या लांबीप्रमाणे २.०५ रुपये ते ८.५० रुपये प्रति स्टिक अशी अतिरिक्त उत्पादन शुल्काची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कालपर्यंत जी सिगारेट १८ रुपयांना मिळत होती, तिची किंमत आता २१ ते २२ रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. याशिवाय पान मसाला आणि गुटख्यावरील GST थेट ४० टक्क्यांवर नेण्यात आल्याने या उत्पादनांच्या दरात मोठी वाढ अपरिहार्य झाली आहे. गुटख्यावर तर एकूण करभार ९० टक्क्यांहून अधिक जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरांमध्ये झालेली वाढ ग्राहकांवर नेमका किती परिणाम करणार, याचे अंदाज पुढीलप्रमाणे आहेत:

• ६५ मिमी पेक्षा कमी लांबीच्या सिगारेट – २ ते ३ रुपये वाढ
• ६५ ते ७० मिमी – साधारण ४ ते ५ रुपये वाढ
• ७० ते ७५ मिमी – ६ ते ७ रुपये वाढ
• ७५ मिमीपेक्षा जास्त ‘किंग साइज’ – १० ते १२ रुपये वाढ (Budget 2026)

किमती का वाढल्या?

या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे ‘विशिष्ट उत्पादन शुल्क’ आणि त्यावर लागणारा ४० टक्के GST. उत्पादन कारखान्यातच लागू होणाऱ्या अतिरिक्त शुल्कामुळे सिगारेटचे बेस प्राइस वाढते आणि त्यावर आकारण्यात येणाऱ्या GST मुळे अंतिम MRP आणखी महाग होते.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews