D Mart ची फ्रँचायझी मिळते का? काय आहे प्रोसेस

Published:
डीमार्ट कोणालाही फ्रँचायझी किंवा एजन्सी देत नाही. डीमार्टची सर्व स्टोअर्स ही पूर्णपणे कंपनीच्या मालकीची असतात. त्यामुळे “डीमार्ट फ्रँचायझी विकत घ्या” अशा जाहिराती किंवा कॉल्सपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे
D Mart ची फ्रँचायझी मिळते का? काय आहे प्रोसेस

D Mart : आज भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातही डीमार्ट (DMart) हे नाव प्रत्येक घरात पोहोचले आहे. साबण-शॅम्पूपासून ते कपडे, किराणा, भांडी, खेळणी अशा दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तू कमी दरात आणि एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे डीमार्ट ग्राहकांची पहिली पसंती ठरली आहे. शहरांसोबतच ग्रामीण भागातही डीमार्टची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. याच यशस्वी व्यवसाय मॉडेलमुळे अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे डीमार्टची फ्रँचायझी घेता येते का? याच प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत.

डीमार्ट फ्रँचायझी: सत्य काय आहे? D Mart

सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या.  डीमार्ट कोणालाही फ्रँचायझी किंवा एजन्सी देत नाही. डीमार्टची सर्व स्टोअर्स ही पूर्णपणे कंपनीच्या मालकीची असतात. त्यामुळे “डीमार्ट फ्रँचायझी विकत घ्या” अशा जाहिराती किंवा कॉल्सपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु फ्रँचायझी नसली तरीही डीमार्टसोबत कायदेशीर आणि अधिकृत मार्गाने पैसे कमवण्याचे दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. D Mart

जमीन भाड्याने देऊन डीमार्टसोबत कमाई

जर तुमच्याकडे स्वतःची जमीन, कमर्शियल प्लॉट, मोठी मोकळी जागा असेल, तर तुम्ही ती डीमार्टला भाड्याने देऊ शकता.

कसे अर्ज करायचा?

डीमार्टच्या अधिकृत वेबसाईटवर जावे
Partner With Us / Supplier Application या विभागात अर्ज भरावा
जमीन, लोकेशन आणि आवश्यक माहिती सादर करावी
डीमार्ट दीर्घकालीन भाडेकरार करतो, त्यामुळे हा स्थिर उत्पन्नाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.