Jio Hotstar 79 Rupees Plan : रिलायन्स जियोने पुन्हा एकदा मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत जियो मोबाईल रिचार्ज आणि इंटरनेट प्लॅन्समुळे चर्चेत असायची, पण यावेळी कंपनीने ओटीटी मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. जियोने आपल्या JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी असे काही प्लॅन्स आणले आहेत, जे सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत. त्यामुळे आता मनोरंजनासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज राहिलेली नाही.
JioHotstar चे नवीन प्लॅन्स काय आहेत? Jio Hotstar 79 Rupees Plan
JioHotstar ने नव्या आणि जुन्या ग्राहकांसाठी नवीन सदस्यता योजना जाहीर केल्या आहेत. या प्लॅन्सची सुरुवात फक्त 79 रुपयांपासून होते, जे आजच्या काळात खूपच स्वस्त मानले जात आहेत. कंपनीने सांगितले आहे की, आजकाल लोक जास्त वेळ मोबाईल, टीव्ही आणि मोठ्या स्क्रीनवर कंटेंट पाहतात. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत.
JioHotstar चे तीन प्रकारचे प्लॅन आहे. यामध्ये मोबाइल प्लॅन, सुपर प्लॅन आणि प्रीमियम प्लॅनचा समावेश आहे. यामधील मोबाइल आणि सुपर प्लॅन हे जाहिरातींसह आहेत, म्हणजे चित्रपट किंवा सीरिज पाहताना मध्ये मध्ये जाहिराती येतील. प्रीमियम प्लॅनमध्ये मात्र जाहिराती नसतात.
मोबाइल प्लॅनची सविस्तर माहिती:
किंमत: 79 रुपये प्रति महिना… एकावेळी फक्त एका मोबाइल फोनवर पाहता येईल. यामध्ये 720p HD व्हिडिओ क्वालिटीचे व्हिडिओ बघायला मिळतात. हा प्लॅन मोबाईल युजर्ससाठी खास डिझाइन केलेला प्लॅन आहे. विशेषतः विद्यार्थी, कमी बजेट असणारे ग्राहक आणि फक्त मोबाईलवर कंटेंट पाहणारे लोक यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे.






