Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयांबाबत नवी अपडेट; शिंदेंची मोठी घोषणा

Published:
आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारने केली होती . मात्र सरकार येऊन वर्ष उलटलं तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय मिळालेच नाहीत. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात बोलताना याबाबत नवीन अपडेट दिली आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयांबाबत नवी अपडेट; शिंदेंची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारांदरम्यान पुन्हा एकदा आमचे सरकार निवडून दिल्यास आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारने केली होती . मात्र सरकार येऊन वर्ष उलटलं तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय मिळालेच नाहीत. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात बोलताना याबाबत नवीन अपडेट दिली आहे. 2100 रुपये योग्य वेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे, तो आम्ही पाळणार आहोत, असं त्यांनी म्हटल आहे.

मी जे बोलतो ते करून दाखवतो (Ladki Bahin Yojana)

आज साताऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला  45 हजार कोटी रुपयांचा खर्च होता, भल्याभल्यांची हिंमत झाली नाही. ज्यांनी या योजनेत खोडा घातला, त्यांना लाडक्या बहिणींनी 232 नंबरचा जोडा दाखवला.  आम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. एवढंच नव्हे तर आम्ही योग्य वेळी 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो.  तो सुद्धा पूर्ण करणार आहोत अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. Ladki Bahin Yojana

इ केवायसी बाबत नवीन अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे ज्यांचा हप्ता थांबला आहे अशा महिलांसाठी राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी (e KYC) प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews