आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न भरणे प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे. आयटीआर भरल्याने आपले उत्पन्न आणि कराची योग्य नोंद सरकारकडे होते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळता येतात. बँकेतून कर्ज घेताना, व्हिसा मिळवताना किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी आयटीआर आवश्यक ठरतो. सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती व रिफंडसाठीही आयटीआर महत्त्वाचा आहे. वेळेवर आयटीआर भरल्यास करदात्याची विश्वासार्हता वाढते.  त्यामध्ये पहिल्यांदा आयटीआर भरताना मात्र काही बाबींची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याबाबत जरा सविस्तर जाणून घेऊ…

पहिल्यांदा आयटीआर भरताना….

तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर तुमच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही. सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरण्याची अंतिम  तारीख 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 31 जुलै होती, जी नंतर वाढवण्यात आली. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी डेडलाइनची वाट पाहू नये. आपण घाईगडबडीत अनेक चुका करू शकता. अशापरिस्थितीत जर तुम्ही पहिल्यांदाच ITR भरणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर (www.incometax.gov.in) स्वत:ची नोंदणी करावी लागेल. हे पोर्टल करदात्यांना करविषयक अनेक सेवा ऑनलाइन पुरवते. नोंदणीची प्रक्रिया आता अतिशय सोपी झाली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर कोणताही करदाता वैध पॅन क्रमांकाच्या मदतीने नोंदणी करू शकतो. एकदा नोंदणी पूर्ण झाली की, आपल्याला करविषयक अनेक सेवा ऑनलाइन मिळतील. यानंतर ITR भरणे सोपे होणार आहे. नोंदणी शिवाय तुम्ही ना ITR भरू शकता, ना परताव्याचा दावा करू शकता. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. यामध्ये वैध आणि सक्रिय पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, प्रत्येक पॅन कार्डसाठी स्वतंत्र नोंदणी आहे. ही काही वैध कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

सूट मिळालेले उत्पन्न दाखवा!

खरंतर आयटीआर भरताना जर तुम्ही देखील आयकर भरणार असाल तर त्यामध्ये सर्व सूट मिळालेल्या उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक आहे. जरी ते करपात्र नसले तरी. यामुळे करदात्यांच्या संपूर्ण उत्पन्नाचा डेटा प्राप्तिकर विभागापर्यंत पोहोचतो. आयटीआरमध्ये कोणत्या श्रेणींमध्ये सूट उपलब्ध आहे याची माहिती देणे देखील आवश्यक आहे. यामुळे कर संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण सहज होऊ शकते.

जर करदात्याने सूटबद्दल ठोस माहिती दिली नाही, तर विभागाकडून डेटा जुळवताना त्रास होऊ शकतो. जर कर विभागाला कागदपत्रे जुळवताना काही तफावत आढळली. जर काही विसंगती आढळली, तर विभागाकडून मंजुरीसाठी कर सूचना जारी केली जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, जर विभागाला नंतर सूट दिलेल्या उत्पन्नाचा काही भाग करपात्र असल्याचे आढळले, तर माहिती न दिल्याबद्दल व्याज किंवा दंड देखील आकारला जाऊ शकतो.

अशा प्रकरणांमध्ये, ही रक्कम एकूण करपात्र उत्पन्नात जोडली जाईल, त्यानंतर कराचा बोजा वाढतो. यासोबतच, कलम 270अ अंतर्गत दंड देखील आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आयकर भरताना सर्व माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे करदात्यांनो, आपल्या सीएच्या योग्य सल्ल्याने करातून मुक्त असलेले उत्पन्न आयटीआरमध्ये दाखवायला विसरू नका. अन्यथा अनेक अडचणींचा सामना आपणास करावा लागू शकतो. त्यामुळे याबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक असते.