व्हाट्सअँप हे जगातील आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून आजही करोडो यूजर्स व्हाट्सअपचा वापर करत असतात. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप बघायला मिळतेच. व्हाट्सअप वरून आपण जवळच्या आणि ओळखीच्या लोकांशी संवाद साधू शकतो, त्यांना फोटो विडिओ पाठवू शकतो. हे सगळं कंपनी आपल्या फ्री मध्ये देते. फक्त त्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट असणे आवश्यक असते. परंतु आता लवकरच व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे संकेत मिळत आहे. त्यामुळे व्हाट्सअप वापरकर्त्यांना हा मोठा धक्का असेल.
कोणासाठी लागू असणार प्लान
मिळालेल्या माहितीनुसार, हा बदल प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेस युजर्सना डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे. यामध्ये व्यवसायांना अधिक उपकरणे जोडणे आणि प्रगत मॅनेजमेंट टूल्स वापरण्यासाठी शुल्क आकारले जाईल. सध्या तरी सामान्य युजर्ससाठी व्हॉट्सॲप मोफत राहणार असले तरी भविष्यात जाहिरातीमुक्त अनुभवासाठी सर्वसामान्यांनाही पैसे मोजावे लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरी जाहिरातीमुक्त अनुभवासाठी भविष्यात सर्वांनाच व्हाट्सअप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. व्हॉट्सॲपच्या या संभाव्य धोरणामुळे जगभरातील करोडो युजर्सचे लक्ष लागले आहे.हे ही वाचा
1Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खूषखबर!! आदिती तटकरेंची मोठी घोषणा
2Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा!! रेपो रेट बाबत RBI चा मोठा निर्णय
3Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा: थकित हप्त्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
4EPF व्याजदरावर सरकारची कात्री? खासगी नोकरदारांच्या निवृत्ती निधीवर संकट!
हे ही वाचा
सर्वसामान्यांना झटका
पेट्रोल-डिझेल, गॅस, दूध, भाज्या… सगळं महाग झालं असताना आता WhatsApp साठीही पैसे द्यायचे का? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. “आधी इंटरनेटसाठी पैसे देतोच, आता मेसेज पाठवायलाही पैसे?” असा संतप्त सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. आज WhatsApp हे फक्त सोशल मीडिया अॅप राहिलेला नाही, तर सर्वसामान्यांच्या आयुष्याचा श्वास बनला आहे. घरातील कामकाज, नातेवाईकांशी संवाद, मुलांचं शिक्षण, नोकरीसंबंधी माहिती, सरकारी मेसेज सगळं काही WhatsAppवर चालतं. अशा परिस्थितीत आता WhatsApp वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, असे संकेत मिळाल्याने सामान्य जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे.