BMC Election 2026 Exit Poll : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीचे मतदान पूर्ण झाली असून नवनवीन एक्झिट पोल समोर येत आहेत. जरी 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक पार पडली असली तरी सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेत. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंची 25 वर्षाची सत्ता महायुती हिसकावून घेणार की राज ठाकरेंच्या साथीमुळे उद्धव ठाकरे यंदाही आपली सत्ता कायम राखणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होतं. अखेर उद्याच्या निकालापूर्वी मुंबई महापालिकेबाबतचे एक्झिट पोल समोर आला आहे. एक्झिट पोल नुसार उद्धव ठाकरेंच्या मुंबई महानगरपालिकेतील 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागणार आहे. एक्झिट पोलच्या या अंदाजामुळे भाजपात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
JVC BMC Exit Poll : BMC Election 2026 Exit Poll
भाजप शिंदे – 138
ठाकरे- मनसे – 59
काँग्रेस-वंचित – 23
इतर – 7
मतांची टक्केवारी किती?
महायुती : 42-45%
शिवसेना ठाकरे- मनसे : 34-37%
काँग्रेस- वंचित : 13-15%
इतर : 6-8% (BMC Election 2026 Exit Poll)
Lokshahi Rudra Research BMC Exit Poll :
भाजप शिवसेना – 121
शिवसेना ठाकरे- मनसे – 71
काँग्रेस वंचित – 25
इतर – 10
Axis My India BMC Exit Poll :
भाजप शिंदे – 131- 151
ठाकरे- मनसे – 58-68
काँग्रेस-वंचित – 12-16
इतर – 6-12
मतदानाची टक्केवारी कशी?
भाजप शिंदे – 42
ठाकरे- मनसे – 32
काँग्रेस-वंचित – 13
इतर – 13






