BMC Election 2026 : ठाकरे बंधू की काँग्रेस?? मुंबईतील मुस्लिम कोणाच्या बाजूने? धक्कादायक सर्वे समोर

Published:
2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी एकत्र असल्याने मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात भरभरून मते दिले होते. मुस्लिम समाजामध्ये उद्धव ठाकरेंबाबत एक आदराचे स्थान आहे
BMC Election 2026 : ठाकरे बंधू की काँग्रेस?? मुंबईतील मुस्लिम कोणाच्या बाजूने? धक्कादायक सर्वे समोर

BMC Election 2026 : सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. एकदा मुंबई महापालिकेत तिरंगी लढत बघायला मिळते. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची महायुती, तर तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस…. एकूणच काय तर वेगवेगळ्या युती आणि आघाड्यामुळे मुंबईच्या राजकारणाचा चांगलाच धुरळा उठणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सर्वे समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर असेंडिया कंपनीचा एक सर्वे मुस्लिम मतदार कोणाकडे वळेल याचे आकडे स्पष्ट करतोय.

मुंबईत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त (BMC Election 2026)

मुंबईत मराठी मतदाराप्रमाणेच मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.  मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी एकत्र असल्याने मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात भरभरून मते दिले होते. मुस्लिम समाजामध्ये उद्धव ठाकरें बाबत एक आदराचे स्थान आहे. ज्याप्रकारे उद्धव ठाकरे भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतात ते पाहता मुस्लिम मतदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतील असे बोलले जात होते. मात्र काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरेंना पहिला झटका बसला. BMC Election 2026

आता मुस्लिम मते कोणाला पडणार?

आता काँग्रेसने स्वतंत्र मुंबई महापालिका निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्यानंतर मुस्लिम मतांमध्येही मोठे विभाजन होण्याची शक्यता आहे. असेंडिया कंपनीच्या सर्वे नुसार, मुंबईतील एकूण मुस्लिम मतदारांपैकी जवळपास 41 टक्के मुस्लिम मतदार काँग्रेसला मतदान करू शकतात.शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आघाडीला 28 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. तर भाजप शिंदेंच्या महायुतीला 11 टक्के मुस्लिम मते मिळतील. इतर मते विविध पक्षात विभागली जातील.

मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण जास्त आहे. मात्र या मतांचा मोठा हिस्सा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेल्यास त्याचा थेट फटका काँग्रेस आणि ठाकरे गट-मनसे आघाडीला बसू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे