BMC Election 2026 : उत्तर भारतीय- गुजरातीही मुंबईचा महापौर होऊ शकतो; सदावर्तेनी ठिणगी पेटवली

Published:
मुंबईत भाषेच्या आधारावर महापौर पदासाठी विरोध करता येणार नाही. उत्तर भारतीय किंवा गुजराती व्यक्तीही मुंबईचा महापौर होऊ शकतो असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं
BMC Election 2026 : उत्तर भारतीय- गुजरातीही मुंबईचा महापौर होऊ शकतो; सदावर्तेनी ठिणगी पेटवली

BMC Election 2026 : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी यावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. ठाकरे बंधूं कडून तर स्पष्टपणे असा आरोप केला जातोय की मुंबईत जर भाजपची सत्ता आली तर भाजप मुंबईला मराठी महापौर देईल तर दुसरीकडे भाजपकडून सातत्याने हा आरोप खोडून आम्हीही मराठी महापौर मुंबईत बसवू असं म्हटलं आहे. आता याच दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एका विधानाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय किंवा गुजराती व्यक्ती होऊ शकतो असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटल आहे.

ठाकरे बंधूंवर टीका (BMC Election 2026)

आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना भवनातून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला वचननामा जाहीर केला. या वचननाम्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सडकून टीका केली. ठाकरे बंधूंचा वचनानामा म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे सदावर्ते यांना वाटते. राज उद्धव यांना कायद्याची खरी समज असेल तर समोर येऊन सांगा की हे जाहीरनामा कायद्याने करता येतो का?” असं आव्हान सदावर्ते यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना दिले. BMC Election 2026

भाषेच्या आधारावर महापौर ठरत नाही

दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मूळचे बिहारचे आहेत असा इतिहासाचा दाखला गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. तसेच मुंबईच्या मराठी महापौराच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य करत ठाकरे बंधूंवर पलटवार केला. मुंबईत भाषेच्या आधारावर महापौर पदासाठी विरोध करता येणार नाही. उत्तर भारतीय किंवा गुजराती व्यक्तीही मुंबईचा महापौर होऊ शकतो असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं. गुणरत्न सदावर्ते यांचा इतिहास बघितला तर ते नेहमीच भाजपला पूरक अशी भूमिका घेताना यापूर्वीही दिसले आहेत. आता त्यांच्या मराठी महापौराबद्दल भाजपकडून आणि ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews