BMC Election 2026: BMC निवडणुकीच्या मतमोजणीत अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

Published:
ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
BMC Election 2026: BMC निवडणुकीच्या मतमोजणीत अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

BMC Election 2026 :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित मतदान यंत्रांवर झालेले मतदान मोजताना जर काही तांत्रिक समस्या उद्भवली, तरच ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या उपकरणाच्या मदतीने निकाल पाहण्याची सोय उपलब्ध आहे.  पाडूचा वापर सर्वसाधारणपणे केला जाणार नसून, केवळ तांत्रिक अडचणीच्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच तो वापरण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

फक्त BMC साठी वापर

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची ही मतदान यंत्रे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जात असून, ती भारत निवडणूक आयोगाच्या मालकीची ‘एम3ए’ प्रकारातील आहेत. या यंत्रांवरील मतमोजणी कंट्रोल युनिट (CU) आणि बॅलेट युनिट (BU) जोडूनच करणे बंधनकारक आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.

140 पाडू यंत्र (BMC Election 2026)

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 140 पाडू यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतमोजणीदरम्यान जर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत पाडूची आवश्यकता भासली, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीतच त्याचा वापर करण्यात यावा. तसेच, पाडूच्या वापरासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संबंधित प्रतिनिधींना प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews