BMC Election Result : रवींद्र वायकरांची मुलगी पडली; जोगेश्वरीत मशाल धगधगली

Published:
जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 मधून शिवसेनेच्या दीप्ती वायकर यांना 10293 मते मिळाले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाच्या  लोना रावत यांना 13424 मते मिळाली .
BMC Election Result : रवींद्र वायकरांची मुलगी पडली; जोगेश्वरीत मशाल धगधगली

BMC Election Result : मुंबईकरांनी महापालिका निवडणुकीत घराणेशाहीला चांगलेच नाकारल आहे. एकीकडे सदा सर्वांकर यांचे चिरंजीव समाधान सर्वणकर यांना पराभवाचा झटका बसल्यानंतर दुसरीकडे जोगेश्वरी मध्ये सुद्धा रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर पराभूत झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्या पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत मुलगीचा पराभव झाल्याने रवींद्र वायकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

किती मतांनी पराभव (BMC Election Result)

जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 मधून शिवसेनेच्या दीप्ती वायकर यांना 10293 मते मिळाले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाच्या  लोना रावत यांना 13424 मते मिळाली . अटीतटीच्या या लढाईत दीप्ती वायकर यांचा पराभव झाला. रविंद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीत अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता. त्यानंतर विधानसभेत पत्नी आणि आता बीएमसीमध्ये मुलगी पराभूत झाली.

समाधान सरवणकरही पराभूत

दुसरीकडे , प्रभाग क्रमांक १९४ मध्ये शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांचा ५९२ मतांनी पराभव झाला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे निशिकांत गोविंद शिंदे यांनी सरवणकर यांना मागे टाकत विजय मिळवला आहे. प्रभाग १९४ मध्ये एकूण ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटातून पुजा विजय पवार, सनय छत्रपती शासन गटातून सुहासिनी कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शंकर उर्फ अशोक गुजेट्टी तसेच सात अपक्ष उमेदवारांनी या वॉर्डातील स्पर्धा अधिक तीव्र केली. अनेक पक्ष आणि अपक्षांनी मैदानात उतरल्याने मतविभाजनाची शक्यता होती, परंतु तरीही मतदारांनी स्पष्टपणे एकाच उमेदवाराला पसंती दर्शवली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews