BMC Election Result : घराणेशाहीला मतदारांनी धडा शिकवला!! महायुतीचे अनेक धुरंदर पराभूत

Published:
महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी घराणेशाहीला चांगला दणका दिला आहे. नेत्यांच्या घरातीलच मुलाला, वहिनीला, चुलत्याला, मतदारांनी स्पष्टपणे नाकारल आहे.
BMC Election Result : घराणेशाहीला मतदारांनी धडा शिकवला!! महायुतीचे अनेक धुरंदर पराभूत

BMC Election Result : महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी घराणेशाहीला चांगला दणका दिला आहे. नेत्यांच्या घरातीलच मुलाला, वहिनीला, चुलत्याला, मतदारांनी स्पष्टपणे नाकारल आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनेक बडा नेत्यांच्या वारसांना यंदा पराभवाचा धक्का बसला आहे.

समाधान सरवणकर

एकनाथ शिंदेंचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच खासदार रवींद्र वायकर यांच्या मुलीचाही मनसे उमेदवाराकडून पराभव झाला आहे. समाधान सरवणकर यांचा 603 मतांनी पराभव झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 194 मधून त्यांचा पराभव केला.

दीप्ती वायकर (BMC Election Result)

शिंदेंचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांची मुलगी दीप्ती वायकर यांचाही निवडणुकीत पराभव झाला. जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 मधून शिवसेनेच्या दीप्ती वायकर यांना 10293 मते मिळाले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाच्या  लोना रावत यांना 13424 मते मिळाली . अटीतटीच्या या लढाईत दीप्ती वायकर यांचा पराभव झाला. BMC Election Result

कप्तान मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सुद्धा या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 165 मध्ये काँग्रेस च्या आशरफ आझमी यांनी त्यांचा पराभव केला.

वैशाली शेवाळे

शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा सुद्धा पराभव झाला. मुंबईतील धारावी भागातील प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे  यांनी वैशाली शेवाळे यांचा 1450 मतांनी पराभव केला.

योगिता गवळी

गुंड अरूण गवळी यांची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचा सुद्धा महापालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. भायखळामधून भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews