BMC Election Result : मुंबई महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल आता जाहीर झाला आहे. सकाळपासून टीव्ही चॅनेलवरच्या बातम्या सुरू होत्या मात्र ते फक्त कल होते अंतिम निकाल नव्हते. परंतु आता सर्वच्या सर्व 227 वर्ड मधील विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत. खरंतर सकाळपासूनच्या काळात शिंदे आणि भाजप यांची माहिती खूपच पुढे गेली होती. त्यामुळे ठाकरे बंधूंचा यंदा दारून पराभव होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला गेला. मात्र, जसजसे मुख्य निकाल समोर येत गेले. तस तसे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आकडे बदलत गेले. ठाकरे बंधू आणि काँग्रेसने अखेरच्या क्षणात पुन्हा एकदा मुसंडी मारली आणि महायुतीला चांगलीच टक्कर दिली.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी (BMC Election Result)
भाजपा ८६
शिवसेना ठाकरे गट ६५
शिंदे गट २६
काँग्रेस २२
एमआयएम ८
समाजवादी पार्टी २
मनसे ६
ncp ३
शरद पवार गट १
अजून 12 वॉर्ड मधील निकाल बाकी आहे.
भाजपचा महापौर निश्चित
दरम्यान, आत्तापर्यंतचे निकाल बघितले (BMC Election Result) तर मुंबईत भाजपचा महापौर निश्चित मानला जात आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस मनसे एमआयएम आणि समाजवादी पार्टी यांची एकत्रित बेरीज केली तरी 115 जागांचा बहुमताचा आकडा गाठणे जवळपास अशक्य वाटत आहे. त्यामुळे अटीतटीच्या या लढाईमध्ये ठाकरे पण तुमच्या हाती निराशा आली आहे.






