Eknath Shinde : 20 वर्षांपूर्वी तुम्ही एकत्र का आला नाही?? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का?? आता, स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात. असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना डिवचल आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेला भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर टीका केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? ?Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, यांना मुंबईशी काही घेणंदेणं नाही. मराठी माणसाशी घेणंदेणं नाही. वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणतात. मग 20 वर्षापूर्वी एक का झाला नाही? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढत आहेत. ते निवडणूक संपल्यावर आराम करायला कुठे जातात तुम्हाला माहीत आहे असे म्हणत एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली. Eknath Shinde
राज ठाकरेंवर निशाणा
यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो. इतरवेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हेच कळतं. मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उदयाही नाही, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.






