Politics News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा फटका बसला बसून भाजपचा महापौर हा जवळपास निश्चित झालाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागांवर मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये अपेक्षित असे यश मिळालं नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे मनसेचा खरा फार्मामुळे उद्धव ठाकरेंचं महापौर पद निसटलं असेही बोलले जाते. अशावेळी निवडणुकीपूर्वीच मनसे ऐवजी जर काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी युती केली असती तर मुंबईत ठाकरे गटाचा महापौर बसला असता का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला..
काय म्हणाले उद्धव ठाकरे? Politics News
पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आजीबाईला मिश्या असतात का?? आमचा महापौर बसेल इतका आकडा दिसत नसला तरी आमच्या पराजयात सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय डागाळलेला आहे. भाजप ज्यांच्या जिवावर महापौर बसवणार आहेत, त्यांचा इतिहास डागाळलेला आहे. आपण कोणतं पाप करतोय, हा विचार त्यांनी केलाय, अशी टीका ठाकरेंनी केली. याउलट मी आणि आदित्य दादर-माहीम अशा सर्व ठिकाणी फिरलो. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होती. आम्हाला भेदभाव दिसला नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. Politics News
देवाने ठरवले तर….
दरम्यान, महापौर पदासाठी जो आकडा लागतो तो आकडा आज तरी आम्ही गाठू शकलेलो नाही. मात्र जो निकाल लागला आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांच्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऐनवेळी मुंबई महापालिकेची गणिते बदलू शकतात का? या चर्चांना यामुळे मोठे उधाण आले.






