Marathi News
Sun, Jan 11, 2026

Mumbai Pune Missing Link : मुंबई पुणे मिसिंग लिंक या दिवशी सुरू होणार; समोर आली मोठी अपडेट

Published:
खर तर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन डिसेंबर २०२५ मध्ये करण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र खराब हवामानामुळे, विशेषतः मुसळधार पाऊस आणि घाट विभागात जोरदार वारे यामुळे या कामाला उशीर झाला.
Mumbai Pune Missing Link : मुंबई पुणे मिसिंग लिंक या दिवशी सुरू होणार; समोर आली मोठी अपडेट

Mumbai Pune Missing Link : पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वरील मिसिंग लिंक” बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर मुंबई आणि पुण्यातील अंतर कमी करणारा हा मिसिंग लिंक कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांना आहे. आता नव्या मिळालेल्या माहितीनुसार 1 मे 2026 रोजी हा मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. एकदा का हा मिसिंग लिंक सुरू झाला की मुंबई आणि पुण्यातील अंतर तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, लोणावळा जवळील प्रकल्प ९८ टक्के पूर्ण झाला आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. रविवारी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रकल्पस्थळाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांना सुरक्षिततेशी तडजोड न करता निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अभियंते आणि कंत्राटदार देखील उपस्थित होते. Mumbai Pune Missing Link

डिसेंबर 2025 चे होते नियोजन

खर तर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन डिसेंबर २०२५ मध्ये करण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र खराब हवामानामुळे, विशेषतः मुसळधार पाऊस आणि घाट विभागात जोरदार वारे यामुळे या कामाला उशीर झाला.

कसा आहे मिसिंग लिंक (Mumbai Pune Missing Link)

“मिसिंग लिंक” प्रकल्पात दोन मुख्य भाग आहेत: ८.९ किमी आणि १.९ किमी लांबीचे दोन बोगदे आणि ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल. यातील बोगदे तयार आहेत, तर पूल जवळजवळ पूर्ण झाला आहे. ९०० मीटर लांबीचा व्हायाडक्ट V-१ देखील पूर्ण झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पुलाची सबस्ट्रक्चर तयार आहे आणि केबल बसवण्याचे काम सध्या सुरू आहे.

हा पूल जमिनीपासून १८० मीटरपेक्षा जास्त उंचीवर बांधला जात आहे. एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी कामांपैकी हे एक आहे. सुपरस्ट्रक्चरच्या स्लॅब डेकच्या कामाला सुलभ करण्यासाठी आठ कॅन्टिलिव्हर फॉर्म ट्रॅव्हलर्स (सीएफटी) बसवण्यात आले होते. एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दररोज सुमारे १,००० कामगार या ठिकाणी काम करत आहेत.