Politics News : अगदी थोडक्यात पडले ठाकरेंचे 14 उमेदवार; अन्यथा मुंबईचा निकाल वेगळाच असता

Published:
महापालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढल्याचा फटकाही ठाकरे गटाला अनेक प्रभागात बसल्याचे पाहायला मिळालं. 
Politics News : अगदी थोडक्यात पडले ठाकरेंचे 14 उमेदवार; अन्यथा मुंबईचा निकाल वेगळाच असता

Politics News : मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या.  खरंतर यंदाची मुंबई महापालिकेचे निवडणूक ही ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आणि तितकीच अडचणीची होती.  समोर भाजप आणि शिंदे गटाचे महाप्रचंड आव्हान ठाकरेंसमोर होते. मात्र या परिस्थितीतही उद्धव ठाकरेंनी आपले 65 नगरसेवक निवडून आणले . मात्र तरीही उद्धव ठाकरे यांचे मुंबईत पुन्हा एकदा आपला महापौर बसवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मुंबई महापालिका निवडणुकीची आकडेवारी आता हळूहळू समोर येत आहे. त्यानुसार एकूण 14 वार्डात ठाकरेंच्या उमेदवारांना अगदी थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागलाय. अन्यथा निवडणुकीचे चित्र वेगळं दिसलं असतं.

ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीत ठाकरेंची बाजी

मुंबई ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध शिंदे यांचे शिवसेना असा सामना 14 वार्डात बघायला मिळाला.  यात 34 जागी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजयी झाले तर दहा ठिकाणी शिंदे गटाला विजय मिळाला.  महापालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढल्याचा फटकाही ठाकरे गटाला अनेक प्रभागात बसल्याचे पाहायला मिळालं.  काही प्रभागात तर दोनशे, तीनशे,  सहाशे मतांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला.  Politics News

थोडक्यात पडलेले उमेदवार (Politics News)

1 प्रभाग 7-सौरभ घोसाळकर 797 मतांनी पराभूत
2 प्रभाग 19-लीना गुढेकर 876 मतांनी पराभूत
3 प्रभाग 25 – सुप्रिया गाडगीळ 934 मतांनी पराभूत
4 प्रभाग 63-देवेंद्र आंबेकर 538 मतांनी पराभूत
5 प्रभाग 65 -प्रसाद आयरे 1 हजार 82 मतांनी पराभूत
6 प्रभाग 125 – सतीश पवार 569 मतांनी पराभूत
7 प्रभाग 126 -शिल्पा भोसले 781 मतांनी पराभूत
8 प्रभाग 148-प्रमोद शिंदे 1 हजार 91 मतांनी पराभूत
9 प्रभाग 168 सुधीर खातू 769 मतांनी पराभूत
10 प्रभाग 176-हर्षदा पाटील 943 मतांनी पराभूत
11 प्रभाग 179-दीपाली खेडकर 503 मतांनी पराभूत
12 प्रभाग 180 -स्मिता गावकर 935 मतांनी पराभूत
13 प्रभाग 190 – वैशाली पाटणकर 121 मतांनी पराभूत
14 प्रभाग 42- प्रणिता निकम 1 हजार 22 मतांनी पराभूत

दरम्यान,  निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकत्रपणे मातोश्रीवर दाखल झाले. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनीही या नगरसेवकांचं उत्साहात स्वागत केले आणि कौतुकाची थाप मारली.. पक्षाच्या कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ विजय मिळवणाऱ्या या शिलेदारांचे रश्मी ठाकरे यांनी विशेष कौतुक केले.