Uddhav Thackeray : …. तर मुंबईत आपलाच महापौर!! ठाकरेंनी उडवून दिली खळबळ

Published:
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी रशमी ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि पक्षाचे इतर नेते मंडळी उपस्थित होते
Uddhav Thackeray : …. तर मुंबईत आपलाच महापौर!! ठाकरेंनी उडवून दिली खळबळ

Uddhav Thackeray : मुंबईत आपला महापौर व्हावा ही इच्छा होती. अजूनही कायम आहे… देवाची मनात असेल तर ही इच्छा सुद्धा आपली पूर्ण होईल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. खरंतर ठाकरे गटाकडे महापौर पद मिळवून देण्याएवढं बहुमत नसतानाही तो ठाकरेंनी केलेले या विधानाचे सर्वत्र चर्चा होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? Uddhav Thackeray

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी रशमी ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि पक्षाचे इतर नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे कालच्या मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातील इतर निकालांनी दाखवून दिलं आहे. Uddhav Thackeray

देवाने ठरवले तर….

महापौर पदासाठी जो आकडा लागतो तो आकडा आज तरी आम्ही गाठू शकलेलो नाही. मात्र जो निकाल लागला आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांच्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऐनवेळी मुंबई महापालिकेची गणिते बदलू शकतात का? या चर्चांना यामुळे मोठे उधाण आले.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews