एकनाथ शिंदे मुंबईत ठाकरेंसोबत सत्तेत जाणार?? म्हणाले आमची विचारधारा….

Published:
मुंबई महापालिका निवडणुकीचे अंतिम निकाल समोर आले असून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. अखेरच्या मतमोजणीत ठाकरे बंधू आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापालिका निकाल रंगतदार केला
एकनाथ शिंदे मुंबईत ठाकरेंसोबत सत्तेत जाणार?? म्हणाले आमची विचारधारा….

मुंबई महापालिका निवडणुकीचे अंतिम निकाल समोर आले असून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. अखेरच्या मतमोजणीत ठाकरे बंधू आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापालिका निकाल रंगतदार केला. मात्र अतितटीच्या या लढाईत ठाकरे बंधूंचा थोडक्यात पराभव झाला. अगदी थोडक्यात जागांपैकी ठाकरे बंधू सत्तेपासून दूर गेले आणि भाजप शिंदे महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली.

ठाकरेंसोबत सत्तेत बसणार का?

यावेळी मुंबई महापालिकेत आपण ठाकरे बंधून सोबत सत्तेत जाणार का असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले आमचे विचारधारा स्पष्ट आहे. भाजप आणि आमची अनेक वर्षांपासून युती आहे. भाजपची आणि आमची विचारधारा एकच आहे आणि या विचारधारे सोबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही असं म्हणत आपण कोणतेही परिस्थितीत ठाकरे बंधू सोबत मुंबई महापालिकेत सत्तेत जाणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं..

ठाकरेंवर टीका

25 वर्षे मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधात मुंबईकरांनी मतदान केलं आहे. ज्यांनी विकासाला विरोध केला त्यांना मुंबईकरांनी नाकारलं आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसेल का असा सवाल केला असता एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. शेवटी मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे, अस म्हणत एकनाथ शिंदे यांनी या अवघड प्रश्नाला बगल दिली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews