Rahul Gandhi PM Prediction : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावे अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र मागील काही वर्षापासून देशात नरेंद्र मोदी यांची लाट आहे. भाजपच्या प्रत्येक डावपेचासमोर पुढे काँग्रेस कार्यकर्ते फेल होताना दिसत आहेत. 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकीत देशात भाजप प्रणेत एनडीएचे सरकार आलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. मात्र एक ना एक दिवस तरी राहुल गांधी पंतप्रधान होतील ही आशा काँग्रेस कार्यकर्ता मनात बाळगून आहे. आता याच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी बातमी समोर येतेय. एका ज्योतिषाच्या भविष्यवाणीनुसार राहुल गांधी 110% पंतप्रधान होतील.
कोणी केली भविष्यवाणी (Rahul Gandhi PM Prediction)
ज्योतिषी मनीष अग्रवाल यांनी भविष्यवाणी केली आहे की, राहुल गांधी एक दिवस नक्कीच देशाचे पंतप्रधान बनतील. 100 टक्के नव्हे तर 110 टक्के राहुल गांधी पंतप्रधान होतील. परंतु राहुल गांधी सध्या पंतप्रधान होणार नाहीत. कारण त्यांच्या जन्म कुंडलीत 2036 नंतर पंतप्रधान पदाचा योग आहे. पुढील दहा वर्षानंतर अमित शहा यांचा प्रभाव कमी होईल आणि राहुल गांधी यांचा प्रभाव देशाच्या राजकारणात वाढत राहील. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची पहिली चुणूक दिसून येईल असा दावा पण मनीष अग्रवाल यांनी केला आहे. Rahul Gandhi PM Prediction
दुसऱ्या ज्योतिषाचे मत वेगळं
दुसरीकडे, ज्योतिषी सुशील कुमार सिंह यांचे मत पूर्णपणे वेगळे आहे. ते म्हणतात की राहुल गांधींची कुंडली निश्चितच प्रभावी आहे, परंतु त्यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता नाही. सुशील कुमार सिंह यांच्या मते, राहुल गांधी सत्तेच्या राजकारणात मोठी भूमिका बजावू शकतात, सरकारे स्थापन करण्यात आणि पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, परंतु ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत. सुशील कुमार सिंह एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी दावा केला की प्रियंका गांधी वाड्रा कधीही पंतप्रधान होणार नाहीत आणि भविष्यात गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य या पदावर पोहोचणार नाही.





