Ajit Pawar Death : अजित पवारांच्या विमानाचा घातपात? कोर्टाच्या देखरेखीखालीच चौकशीची मागणी

Published:
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या विमानाचा घातपात? कोर्टाच्या देखरेखीखालीच चौकशीची मागणी

Ajit Pawar Death । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दुःखद घटना मानली जात आहे.अजितदादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचा अपघात हा खरच अपघात होता कि यामागे घातपाताची शक्यता आहे? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच शंका उपस्थित करत घातपाताच्या शक्यतांना आणखी बळ दिले.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ?

अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समजताच मला मोठा धक्का बसला आहे. देशातील लोकांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेचा काही भरवसा नाही. अजित पवार सत्ताधारी महायुतीपासून दूर जात होते. ते सत्ताधाऱ्यांसोबत होते. पण काही दिवसांपूर्वी मी एक विधान वाचलं होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरील पक्षातील कोणीतरी विधान केलं होतं की, अजित पवार यांना भाजपाला सोडायचं आहे. त्यात आता जे झालं आहे त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच ही चौकशी झाली पाहिजे. इतर कोणतीही यंत्रणा नको. सर्व यंत्रणा विकत घेण्यात आल्या आहेत असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी वेगळीच शंका उपस्थित केली. Ajit Pawar Death

नेमका कसा घडला अपघात Ajit Pawar Death

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, विमान खाली येत असतानाच काहीतरी अनर्थ होणार असल्याची जाणीव झाली होती. सुरुवातीला विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरणार असं वाटत होतं. मात्र अचानक विमानाचा तोल गेला आणि धावपट्टीपासून अवघ्या सुमारे १०० फूट अंतरावर विमान कोसळलं. विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचे लोट दूरवर पसरले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही वाचवणं शक्य झालं नाही. वैमानिकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरवण्याचा प्रयत्न केल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून आजचा दिवस महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला आहे.

विमानात कोण कोण होते?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक