Ajit Pawar Death : अजित पवार यांच्यासोबत झालेला हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेली घातपाताची शक्यताही फेटाळून लावली.
हा निव्वळ अपघात (Ajit Pawar Death)
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार हेदेखील बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांनी बारामतीतील शासकीय रुग्णालयात जाऊन अजित पवार यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेला हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. या अपघाताच्या मुळाशी राजकारण आहे, अशी भूमिका कलकत्यावरून मांडली गेली. यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, एका कर्तृत्त्ववान व्यक्तीला महाराष्ट्राला मुकला अशा शब्दांत शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. Ajit Pawar Death
हे ही वाचा
ममता बॅनर्जी यांनी कोणती शंका व्यक्त केली
अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समजताच मला मोठा धक्का बसला आहे. देशातील लोकांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेचा काही भरवसा नाही. अजित पवार सत्ताधारी महायुतीपासून दूर जात होते. ते सत्ताधाऱ्यांसोबत होते. पण काही दिवसांपूर्वी मी एक विधान वाचलं होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरील पक्षातील कोणीतरी विधान केलं होतं की, अजित पवार यांना भाजपाला सोडायचं आहे. त्यात आता जे झालं आहे त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच ही चौकशी झाली पाहिजे. इतर कोणतीही यंत्रणा नको. सर्व यंत्रणा विकत घेण्यात आल्या आहेत असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी वेगळीच शंका उपस्थित केली.