Ajit Pawar : मागील काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकत्र येण्याच्या हालचाली वाढले आहेत. खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीत तुतारी आणि घड्याळ या दोन्हींनी युती केल्याने लवकरच राष्ट्रवादी अधिक प्रमाणे एकसंघ होणार या शक्यतांना बळ मिळालं. साहेब आणि दादा लवकरात लवकर एकत्र येतील असं कार्यकर्त्यांना सुद्धा वाटू लागलं. त्यातच आज एका जाहीर सभेत अजित पवारांनी साहेबांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी पुन्हा एक होण्याचे संकेत दिले.
काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)
आम्ही यावेळेस तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलं आहे. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे असे अजित पवार म्हणाले. केंद्राचं आणि राज्याचं राजकारण महापालिकेत आणायचं नाही. तिथलं राजकारण तिथं ते इथं आणायचं नाही असे सांगयला सुद्धा अजितदादा विसरले नाहीत. Ajit Pawar
भाजपवर निशाणा
यावेळी अजित पवारांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका कोण? असा सवाल करत त्या आकाला संपवायचं आहे, अस म्हणत अजित पवारांनी नाव न घेता भाजपला लक्ष्य केलं.
मागील काही दिवसापासून महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक आणि आरोप प्रत्यारोप होताना दिसतायेत. एकीकडे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना दुसरीकडे आपल्या काकांशी अजित पवार जुळवून घेताना दिसतायेत. काका पुतण्याच्या या राजकारणामागे नेमकं दडले तरी काय हे येणाऱ्या काळात नक्कीच स्पष्ट होईल.






