Ajit Pawar Plane Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल दररोज नवनवीन तर तर्क वितर्क लढवले जात आहेत. सुरुवातीला माध्यमांच्या बातमीनुसार अपघात झाला त्यावेळी विमानात सहा व्यक्ती असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर काही तासाभरातच विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अशावेळी तो सहावा माणूस कोण होता आणि आता तो कुठे आहे या चर्चांना जोर आला. आता मात्र याबाबतची अपडेट समोर आली आहे.
खरंतर काल-परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विमानात ५ लोक प्रवास करत होती की ६ असा सवाल केला होता?? मग तो सहावा माणूस नेमका कुठे आहे त्याचा मृतदेह का सापडला नाही ??अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. आता मात्र प्रत्यक्षदर्शी आणि गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी विमानात अपघात त्यावेळी किती लोक होती याची माहिती सांगितली आहे.
विमान 8.35 ते 8.40 च्या आसपास गावाच्या बाजूने घिरट्या घालून आलं आणि त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते एका बाजूला झुकले आणि धावपट्टीजवळ कोसळले. विमान पडल्यानंतर मी तिथे पोहोचलो. त्यावेळी एक निळी पॅन्ट असलेला माणूस विमानातून उतरायचा प्रयत्न करत होता, म्हणजे त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा थोडा उघडलेला होता. त्याचवेळी मोठा स्फोट झाला.
सरपंच पुढे म्हणाले, विमानाच्या स्पोटानंतर मी डावीकडे गेलो, तिथे एक बॉडी पडली होती. त्यावेळी किरण गुजर आले आणि त्यांनी सांगितलं की हे अजित दादांचे विमान आहे आणि हे अजित पवार आहेत. मात्र आमचा त्यावर विश्वास बसला नाही. उजव्या बाजूला दादांचे अंगरक्षक पडलेले होते. आतमध्ये 3 लोक होते. आम्ही ट्रॅक्टरने विमान तोडून विमानातील लोक बाहेर काढली. म्हणजे आतमध्ये ६ नव्हे तर ५ लोक होते हे स्पष्ट झालं.






