Ajit Pawar Plane Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. बारामती येथे लँडिंगच्या काही क्षणांपूर्वीच विमान कोसळल्याची घटना घडली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर अपघाताबाबत विविध तर्क-वितर्क मांडले जात असून, कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अपघात नेमका कशामुळे झाला? तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण? विमानात असलेल्या प्रवाशांच्या संख्येबाबत विसंगती का दिसते? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. आता या चौकशीचा प्राथमिक अहवाल समोर आल्याची माहिती मिळत आहे.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक निष्कर्षांमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आहेत:
१) तांत्रिक बिघाडाची शक्यता Ajit Pawar Plane Accident
लँडिंगपूर्व टप्प्यात विमानाच्या इंजिन किंवा कंट्रोल सिस्टीममध्ये अचानक बिघाड निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे विमानाचे संतुलन ढासळले आणि वैमानिकाचे नियंत्रण कमी झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. Ajit Pawar Plane Accident
२) लँडिंग अँगलमध्ये त्रुटी
विमान उतरताना योग्य अँगल आणि उंचीचा अंदाज चुकल्याचेही अहवालात नमूद असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या प्रयत्नात लँडिंग यशस्वी न झाल्याने वैमानिकाने ‘गो-अराउंड’ घेऊन पुन्हा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान अस्थिर झाले आणि नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी हे होते, अशी ओळख समोर आली आहे. कॅप्टन कपूर अनुभवी वैमानिक मानले जात होते. तरीही तांत्रिक बिघाड आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा संयुक्त परिणाम या अपघातास कारणीभूत ठरला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत






