Ajit Pawar Plane Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दुःखद घटना मानली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतं. यामुळे वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि काही क्षणांतच विमानाने भीषण अपघात केला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.
नेमका कसा घडला अपघात Ajit Pawar Plane Accident
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, विमान खाली येत असतानाच काहीतरी अनर्थ होणार असल्याची जाणीव झाली होती. सुरुवातीला विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरणार असं वाटत होतं. मात्र अचानक विमानाचा तोल गेला आणि धावपट्टीपासून अवघ्या सुमारे १०० फूट अंतरावर विमान कोसळलं.
विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचे लोट दूरवर पसरले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही वाचवणं शक्य झालं नाही. वैमानिकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरवण्याचा प्रयत्न केल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.Ajit Pawar Plane Accident
या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून आजचा दिवस महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला आहे.
विमानात कोण कोण होते?
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक






