Ajit Pawar Plane Crash CCTV Video : अजित पवारांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर

Published:
धावपट्टीजवळ लावलेल्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही मध्ये तुम्ही पाहू शकता कि, विमान वेगाने खाली उतरताना दिसत आहे, त्यानंतर ते जमिनीवर आदळते आणि आगीच्या लोळात पेट घेते, त्यानंतर अनेक स्फोट होतात
Ajit Pawar Plane Crash CCTV Video : अजित पवारांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दुःखद घटना मानली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतं. यामुळे वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि काही क्षणांतच विमानाने भीषण अपघात केला दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचा अपघात हा खरच अपघात होता कि यामागे घातपाताची शक्यता आहे? अशा चर्चा सुरु झाल्या. याच दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. हा विडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल.

काय आहे CCTV मध्ये ? Ajit Pawar Plane Crash CCTV Video

धावपट्टीजवळ लावलेल्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही मध्ये तुम्ही पाहू शकता कि, विमान वेगाने खाली उतरताना दिसत आहे, त्यानंतर ते जमिनीवर आदळते आणि आगीच्या लोळात पेट घेते, त्यानंतर अनेक स्फोट होतात . अपघातस्थळी काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे. विमानाच्या अवशेषांच्या दृश्यांमध्ये धावपट्टीच्या बाहेर लियरजेटच्या धडाचे विखुरलेले तुकडे आणि भाग दिसत आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात होता. ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. Ajit Pawar Plane Crash CCTV Video

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, विमान खाली येत असतानाच काहीतरी अनर्थ होणार असल्याची जाणीव झाली होती. सुरुवातीला विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरणार असं वाटत होतं. मात्र अचानक विमानाचा तोल गेला आणि धावपट्टीपासून अवघ्या सुमारे १०० फूट अंतरावर विमान कोसळलं. विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचे लोट दूरवर पसरले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही वाचवणं शक्य झालं नाही. वैमानिकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरवण्याचा प्रयत्न केल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.Ajit Pawar Plane Accident या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून आजचा दिवस महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला आहे.

विमानात कोण कोण होते?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews