Marathi News

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा अपघात झालेला विमान कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर

Last Updated:
अजित पवारांचा अपघात झालेला हा विमान नेमका कोणत्या कंपनीचा होता त्याचे महत्व काय आहे याबाबत माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा अपघात झालेला विमान कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar news:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. बारामतीत विमान लँडिंगदरम्यान कोसळले. उपमुख्यमंत्री ज्या विमानातून प्रवास करत होते ते एका एव्हिएशन चार्टर कंपनीचे लिअरजेट ४५ होते. त्याचा नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके असा होता. हा विमान नेमका कोणत्या कंपनीचा होता त्याचे महत्व काय आहे याबाबत माहिती समोर आली आहे.

कोणत्या कंपनीचे होते विमान-
समोर आलेल्या माहितीनुसार हे विमान दिल्लीत स्थित असलेल्या व्हीएसआर एव्हिएशन या कंपनीचे होते. ही एक एअर चार्टर कंपनी आहे जी बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ आणि ४५एक्सआरसह अनेक व्यावसायिक विमानांचे व्यवस्थापन आणि संचालन करते.

हे विमान लिअरजेट ४५ विमान बॉम्बार्डियर एरोस्पेसच्या लिअरजेट विभागाने बनवले होते. हे एक मध्यम आकाराचे व्यावसायिक जेट विमान आहे. हे विमान १९९० पासून २०१२ पर्यंत लिअरजेट विभागाचे मुख्य उत्पादन होते. याचे एकूण चार मुख्य मॉडेल आहेत. ओरिजनल मॉडेल ४५, मॉडेल ४५एक्सआर, मॉडेल ४० आणि मॉडेल ४०एक्सआर अशी त्यांची नावे आहेत.

विमानाची किंमत-
माहितीनुसार लिअरजेट ४५ ची किंमत मॉडेलनुसार वेगवेगळी असते. पूर्वी उत्पादित किंवा वापरल्या जाणाऱ्या लिअरजेट ४५ विमानांची किंमत साधारणपणे २.३ दशलक्ष ते ४.९ दशलक्ष डॉलर्स दरम्यान असते. परंतु नवीन विमानाची किंमत साधारणपणे १० दशलक्ष डॉलर्स आहे. विमानाचे वय, त्याची वैशिष्ट्ये आणि कोणत्याही अतिरिक्त वैशिष्ट्यांवर देखील ही किंमत अवलंबून असते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews